नारायण राणे यांनी आज (26 ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेऊन, उद्धव ठाकरेंनी या वेळचा दसरा मेळावा मुलाला क्लिनचिट देण्यासाठी घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातून नारायण राणे, नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यावर टीका केली.
हे वाचा : बाळासाहेब ठाकरे असते तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं नसतं
यावेळी नारायण राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र पाहावा, सांभाळावा,” अशी टीका राणे यांनी केली आहे.”हिंदुत्त्वावर बोलण्याचा उद्धव ठाकरेंना नैतिक अधिकार नाही. बेईमानी करून पद मिळवलं. कारण 145 आमदार यांचे नाहीत. 56 आमदारांवर हिंदुत्त्वाला मूठमाती देऊन पद मिळवलं,” असाही आरोप राणेंनी केला. (politics)
“सुशांत सिंह राजपूतची प्रकरणी आदित्य ठाकरे कोठडीत जाईल, सत्तेचा दुरुपयोग करून स्वत:च्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न आहे. सुशांतच्या प्रकरणात त्याला मारलं, कशानं मारलं सर्व बाहेर येईल. दिशा सालियनवर बलात्कार कुणी केली, तिला वरून कुणी टाकलं, हे सर्व समोर येईल,” असा गंभीर आरोप नारायण राणेंनी केलं आहे.
उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना छळलं आहे. 2005-06 ची घटना सांगतो. बाळासाहेबांना वाटत होतं की, सेनाभवनासमोर दसरा मेळावा घ्यावा. नवीन शिवसेना भवन बांधून झालं होतं. तेव्हा नेत्यांना बोलावून बाळासाहेबांनी सर्व नेत्यांना सांगितलं. मात्र, दुसऱ्या दिवशी सामना वृत्तपत्रात आलं की, शिवाजी पार्कात दसरा होईल, असं आलं. बाळासाहेबांना धक्का बसला. मी घेतलेले निर्णय बदलले जातात, असं साहेबांना वाटलं.” 27 जुलै 2006 साली वाढदिवसाला उद्धव ठाकरेंनी नवीन शिवसेना भवनाचं उद्घाटन केलं, असाही गौप्यस्फोट राणेंनी केला आहे.
“उद्धव ठाकरेंनी अशी भाषा सोडली नाही, तर आमचा तोल गेल्यास महागात पडेल. साहेबांकडे पाहून गप्प बसलो. आमच्याकडे नजर टाकू नका, अन्यथा पळताभूई थोडी होईल. कुणाला वाघाची भाषा करता, शेळपट कुठलं!”
“उद्धव ठाकरेंना बजेट कळतो का, जीडीपी कळतो का, राज्याची अर्थव्यवस्था कळते का? शून्य माहिती आहे. अधिकारी हसतात. बुद्धू मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला आहे, कालचा दसरा मेळावा हा फक्त विरोधकांना अपमानित करण्यासाठी द्वेषानं केलेलं भाषण आहे. त्या भाषणाला अर्थ नाही. बेडूक आला, अमूक आला-तमूक आला, अरे एका रेषेत काहीतरी बोला?”
“थापाबाज, दिशाभूळ करणारा मुख्यमंत्री आहे. मराठ्यांना आरक्षण देऊ शकत नाही. मराठ्यांचा द्वेष करणारा मुख्यमंत्री आहे.” “मुख्यमंत्र्यांना कुणी विचारत नाहीत. शिवसैनिकही मानत नाहीत. वर्षावर भेटत नाहीत, मातोश्रीवर प्रवेश नाही. खेळण्यातला मुख्यमंत्री आहे. कठपुतळी आहे. कठपुतळी दुसऱ्याच्या हातावर नाचते तरी, यांना नाचताही येत नाही.