मुंबई | निसर्ग चक्रीवादळाने राज्यात 1 हजार 65 कोटीहून अधिक रुपयांचं नुकसान झालं आहे तर 5 ऑगस्ट 2020 रोजी वादळासह पडलेल्या पावसाने मुंबईत अंदाजे 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झालं आहे, अशी माहिती देऊन मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे राज्याला लवकरात लवकर मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्रासह बिहार, उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक, आसाम ह्या सहा राज्यातही अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ क़ॉन्फरन्सिंगद्वारा संवाद साधला.
नैसर्गिक आपत्तीच्या निवरणासाठी सर्व राज्यात समन्वय साधण्याकरिता राष्ट्रीय स्तरावर पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकऱ्यांनी केली. इंटरस्टेट फॅड मॅनेजमेंट सिस्टिम उपयुक्त असली तरी त्यात केंद्र शासनाचे प्रतिनीधी असावेत, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.