बीड: शेतक-यांना यावेळी प्राधान्याने कर्जवाटप केले जावे तसेच. कर्जवाटप न केल्यास बॅंकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले.
राज्यात बीड जिल्ह्यातील शेतक-यांना सर्वात जास्त प्रमाणात कर्जमाफी मिळालेली आहे. आता नव्याने पिक कर्ज वाटप करण्यासाठी बॅंकांनी सज्ज व्हावं आणि कुठलीही दिरंगाई न करता प्रमाणे कर्ज रक्क्म मंजूर करून तात्काळ कर्जाची रक्कम अदा करावी.
बॅंकांनी दर आठवड्यातील बुधवारचा संपूर्ण दिवस फक्त नव्याने पीक कर्ज अर्ज स्वीकारावे असे सांगून बँकांकडून शेतकऱ्यांना इतर कर्जांचे नाहरकत प्रमाणपत्र, कागदपत्रांची मागणी करण्यात येते त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो याबाबत पालक मंत्री श्री मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सर्व प्रमुख बँकांच्या प्रमुख अधिकारी/प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत या सूचना ना. मुंडे यांनी दिल्या आहेत. यावेळी आ. प्रकाश सोळंके, आ. संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, शिवाजी सिरसाट, यांसह जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक तसेच सर्व प्रमुख बँकांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.