बीड (प्रतिनिधी):
बीड नगरपरिषदेच्या नवनियुक्त नगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे यांनी आज आपल्या पदाचा अधिकृत पदभार स्वीकारला आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर त्यांनी आज बीड नगरपालिकेत जाऊन नगराध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली.
यावेळी समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. बीड नगरपालिकेच्या नवनियुक्त नगराध्यक्षा म्हणून आता त्यांच्या कामकाजाला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे.