मुंबई: परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी रविवारी विधानसभेत महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी थेट म्हटले की, “या महाराष्ट्रातील सामाजिक समता संपली आहे!” ओबीसी आंदोलक आणि अभ्यासक ॲड. मंगेश ससाणे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी राज्यातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली.
मुंडेंनी मांडले हल्ल्यांचे मुद्दे: ‘सामाजिक समता संपली!’
धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात ओबीसी आंदोलकांवर झालेल्या सहाजिक हल्ल्यांची मालिकाच सभागृहासमोर ठेवली:
ॲड. मंगेश ससाणे यांच्या वाहनावर मध्यरात्री झालेला हल्ला.
काही दिवसांपूर्वी लक्ष्मण हाके यांच्या सहकाऱ्यावर माजलगावमध्ये झालेला जीवघेणा हल्ला, ज्यात त्याचे हात-पाय तोडले गेले. या हल्ल्यातील एकही आरोपी अजून पकडला गेलेला नाही, असे मुंडे यांनी सांगितले.
ओबीसी आंदोलक वाघमारे यांच्यावर झालेला हल्ला.
या घटनांचा संदर्भ देत मुंडे पोटतिडकीने म्हणाले, “आजघडीला महाराष्ट्रात सामाजिक आंदोलन करणारा कार्यकर्ता सुरक्षितपणे फिरु शकतो का? हा प्रश्न आहे. या महाराष्ट्रातील सामाजिक समता संपली आहे.”ुंबई: परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी रविवारी विधानसभेत महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी थेट म्हटले की, “या महाराष्ट्रातील सामाजिक समता संपली आहे!” ओबीसी आंदोलक आणि अभ्यासक ॲड. मंगेश ससाणे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी राज्यातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली.
म
ुंडेंनी मांडले हल्ल्यांचे मुद्दे: ‘सामाजिक समता संपली!’
धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात ओबीसी आंदोलकांवर झालेल्या सहाजिक हल्ल्यांची मालिकाच सभागृहासमोर ठेवली:
* ॲड. मंगेश ससाणे यांच्या वाहनावर मध्यरात्री झालेला हल्ला.
* काही दिवसांपूर्वी लक्ष्मण हाके यांच्या सहकाऱ्यावर माजलगावमध्ये झालेला जीवघेणा हल्ला, ज्यात त्याचे हात-पाय तोडले गेले. या हल्ल्यातील एकही आरोपी अजून पकडला गेलेला नाही, असे मुंडे यांनी सांगितले.
* ओबीसी आंदोलक वाघमारे यांच्यावर झालेला हल्ला.
या घटनांचा संदर्भ देत मुंडे पोटतिडकीने म्हणाले, “आजघडीला महाराष्ट्रात सामाजिक आंदोलन करणारा कार्यकर्ता सुरक्षितपणे फिरु शकतो का? हा प्रश्न आहे. या महाराष्ट्रातील सामाजिक समता संपली आहे.”
मारहाण करणाऱ्यांना ‘योद्धा’ संबोधतात!
मुंडे यांनी पुढे समाजिक माध्यमांवरच्या प्रवृत्तीवर तीव्र आक्षेप घेतला. ते म्हणाले:
“एकमेकांना मारुन सोशल मीडियावर स्टेटस ठेवली जातात, मारहाण करणाऱ्यांना योद्धा म्हटले जाते. त्यांना अटक होत नाही. एकाला शिक्षा होते, परंतु, सारखाच गुन्हा असलेल्या दुसऱ्याला शिक्षा होत नाही. या सगळ्यामुळे महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था उरली आहे की नाही, हा प्रश्न पडतो.”
गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे तात्काळ आणि निर्णायक उत्तर
धनंजय मुंडे यांनी कायदा आणि सुव्यवस्थेवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केल्यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेच सभागृहात उत्तर दिले.
फडणवीस यांचे हे उत्तर अत्यंत मोजक्या शब्दांत होते, ज्यामुळे त्यांनी या विषयाची गंभीर दखल घेतल्याचा आणि त्वरित कारवाई करण्याचे संकेत दिले:
“अध्यक्ष महोदय, यासंदर्भात कडक कारवाई केली जाईल.”