योजना शिक्षणाधिकारी किरण कुंवर यांनी पदभार स्वीकारला
प्राथमिक शिक्षण विभागाचाही अतिरिक्त कार्यभार

योजना शिक्षणाधिकारी किरण कुंवर यांनी पदभार स्वीकारला
प्राथमिक शिक्षण विभागाचाही अतिरिक्त कार्यभार सोपविणार

बीड दि.9 (प्रतिनिधी):
धुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी श्रीमती किरण कुंवर यांनी शुक्रवार दि. 12 डिसेंबर 2025 रोजी बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला.
महाराष्ट्र शासनाने दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी किरण कुंवर यांच्या बदलीचे आदेश निर्गमित केले होते.
शुक्रवारी शिक्षणाधिकारी कुंवर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांची भेट घेतली. यावेळी माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी श्रीमती प्रियाराणी पाटील उपस्थित होत्या. बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार कुंवर यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे.
योजना शिक्षणाधिकारी संजय पंचगल्ले यांची लातूर येथे बदली झाल्यापासुन बीड येथील योजना शिक्षणाधिकारी पद रिक्त होते.
शिक्षणाधिकारी डॉ. किरण कुंवर यांना अनुभवी, कार्यतत्पर आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जाते. किरण कुंवर यांनी पदभार स्वीकारल्यामुळे जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्तावाढ आणि विविध शैक्षणिक उपक्रमांना गती येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

error: Content is protected !!