ध्वजदिन निधी संकलनात  जिल्हा राज्यात प्रथम
जिल्हाधिकाऱ्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार



बीड दि.10 (प्रतिनिधी):
     माजी सैनिकांच्या कल्याणार्थ विविध योजना व उपक्रम राबविण्यासाठी दरवर्षी ७ डिसेंबर हा ‘ध्वजदिन’ म्हणून पाळण्यात येतो. यानुसार 7 डिसेंबर ते पुढील वर्षाच्या नोव्हेंबर अखेरपर्यत ध्वजदिन निधीचे संकलन करण्यात येते,
देशाच्या सुरक्षेसा्ठी प्राणार्पण करणारे शूरवीर, सेवेत अपंगत्व प्राप्त झालेले जवान ‘तसेच सशस्तर दलातून सेवानिवृत्त झालेल्या सैनिकांच्या पुनर्वसनासाठी या निधीचा वापर केला जातो. याशिवाय सैनिकी मुलांच्या वसतिगृहांचे संचालन व इतर कल्याणकारी उपक्रमांसाठीही हा निधी महत्त्वपूर्ण ठरतो.
दरवर्षी शासन निर्णयानुसार लोकसंख्येच्या आधारे प्रत्येक जिल्ह्याला ध्वजनिधी संकलनाचे उद्दष्ट दिले जाते ध्वजनिधी-2024 (संकलन वर्ष 2024-25) या वर्षासाठी बीड जिल्ह्याला रुपये 39,50,000/- (एकोणचाळीस लाख पन्नास हजार) इतके उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते.
      जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, ध्वजदिन निधी संकलन समिती यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये तसेच शैक्षणिक संस्थांना सक्रीय सहभागाचे आवाहन करण्यात आले. जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी मे 2025 पर्यत 100% उद्दि्ट पूर्ण झाले. दि. 30 नो्हेंबर 2025 पर्यंत एकूण रुपये 1,32,30,000/- अक्षरी एक कोटी बत्तीस लाख तीस हजार इतका निधी गोळा करून 335% संकलनासह राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे
    राज्यातील सर्वोच्च संकलनाबद्दल महामहीम राज्यपाल आचार्य देवव्रत,  यांच्या वतीने दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी मुंबईतील लोकभवन येथे जिल्हाधिकारी  विवेक जॉन्सन यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
माजी सैनिकांच्या कल्याणासाठी ही कामगिरी अत्यंत अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन करीत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सर्वाचे कौतुक केले.  निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्कॉड्रन लीडर विद्यासागर कोरडे (नि.) यांनीही बीड जिल्ह्यातील जनतेचे व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

error: Content is protected !!