बीड दि.(प्रतिनिधी):
बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी अचानक बीड पंचायत समितीला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी अनुपस्थितीत असलेल्या 9 जणांना तत्काळ कारणे दाखवा नोटीस दिली. समाधानकारक खुलासा न आल्यास कारवाई करण्याचे संकेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत. या भेटीमुळे अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी अनेक दिवसानंतर केलेल्या कारवाईमुळे ते ॲक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून आले.
या संदर्भात माहिती अशी की, बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बुधवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी बीड पंचायत समितीला अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी विविध विभागात जाऊन उपस्थित नसलेल्या 9 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची माहिती घेतली. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या भेटीमध्ये सहाय्यक कार्यक्रम अधिकारी- 2, डाटा एन्ट्री ऑपरेटर- 4, सहाय्यक लेखाधिकारी- 2, कनिष्य लेखाधिकारी- 1,आणि कनिष्ठ लिपिक- 2 असे 9 अधिकारी आणि कर्मचारी अनुपस्थितीत आढळून आले आहेत.
बीड पंचायत समितीमध्ये सुरू असलेल्या विविध विकास कामासंदर्भातही मुख्य कार्यकारी अधिकारी रहमान यांनी कर्मचाऱ्यांना विचारले. यावेळी 9 अधिकारी व कर्मचारी पूर्व परवानगी अथवा रजा न घेता l अचानक गैरहजर असल्याचे दिसून आले. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तात्काळ ॲक्शन घेत या अधिकारी व कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली आहे.
*जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्याची जागेवर बसत नाहीत*
दस्तूर खुर्द बीड जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी रहमान यांनी बीड पंचायत समितीला भेट दिली असताना 9 अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित असल्याचे दिसून आले. असाच प्रकार जिल्हा परिषदेच्या कार्यालयात शिक्षण विभागासह मोठी आस्थापना असलेल्या अन्य विभागातही कर्मचारी नेहमीच गैरहजर असतात. जेवणाच्या सुट्टीच्या नावाखाली इकडे, तिकडे भटकंती करत असल्याचे दिसून येतात. अनेक जण तर विभाग प्रमुखांनाही जुमानत नाहीत. जिल्हा परिषदेत अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावरही अंकुश नाही. त्यांच्यावरही नियंत्रण ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.