महंत सुरेशानंद शास्त्री यांची वारकरी महामंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

बीड दि.10 (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ जिल्हाध्यक्षपदी श्रृंगऋषीगडाचे महंत ह.भ.प  सुरेशानंद महाराज, शास्त्री, श्रृंगरुषीगड,यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर निवडीचे सर्वत्र स्वागत होते आहे. 
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, वारकर्‍यांचे संघटन व्हावे आणि ऐक्य आणि एकात्मतेसाठी वारकरी महामंडळ  या संघटनेची स्थापना करण्यात आली आहेे. सदर संघटनेस शासनाची मान्यता असून विशेष दर्जा देण्यात आलेला आहे. संघटनेच्या वाढीसाठी आणि बळकटीसाठी विविध नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये बीड जिल्हा अध्यक्षपदी ह.भ.प. सुरेशानंद महाराज यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महंत ह.भ.प. सुरेशानंद महाराज यांचे बीड जिल्हयात आणि नगर जिल्ह्यात फार मोठे कार्य आहे. ग्रामीण आणि शहरी भागात जावून आध्यात्माबरोबरच समाज सुधारणेचे काम करत आहेत.  ग्रामीण भागात खेडोपाडी अनेक गावात  अखंड हरिनाम सप्ताह होतात ,कीर्तनाच्या माध्यमातून, समाजप्रबोधन, मुलांना दर्जेदार शिक्षण देऊन, अधिकारी बनवा, गोहत्या बंद करा, गाय वाचवा, देश वाचवा, हुंडाबळी, स्त्रीभृणहत्या, व्यसनमुक्ती, यासारखे अनेक समाजहिताचे कार्य सुरेशानंद शास्त्री महाराज करत असतात.  गुरूवर्य वै.तुकाराम महाराज रुपनर यांच्या मार्गदर्शनाखाली महंत सुरेशानंद महाराज यांचे कार्य सुरू आहे.
महंत सुरेशानंद महाराज यांचे कार्य पाहून त्यांची संघटनेच्या बीड जिल्हाध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली आहे. मराठवाडा विभागीय अध्यक्ष ह.भ.प. महंत महादेव महाराज  बोराडे शास्त्री यांनी सदर पदभार दिला आहे.
सुरेशानंद महाराज यांच्या निवडीबद्दल अनेकांनी आनंद व्यक्त करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!