तणावपूर्ण वातावरणात सासरी घरासमोरच केला गौरी गर्जे’ चा अंत्यविधी

बीड दि.24 (प्रतिनिधी):
मंत्री पंकजा मुंडे यांचा खाजगी स्वीयसहाय्यक यांच्या पत्नी गौरी गर्जे (पालवे) यांच्या अंत्यसंस्कारासाठी पाथर्डी तालुक्यातील मोहोज (देवडे) गावात दोन्ही गटात मोठा तणाव निर्माण झाला. अखेर तीन तासांनी दोन्ही बाजूच्या प्रमुख लोकांनी केलेल्या मध्यतीमुळे घरासमोर ताणावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू यांच्यासह मोठा पोलिस फौजफाटा उपस्थित होता.
दि.22 नोहेंबर 2025 रोजी गौरी अनंत गर्जे (पालवे) यांचा मृत्यूची बातमी माध्यमात आल्याने खळबळ उडाली होती. गौरीचा दोन महिन्यापासून शारीरिक आणि मानसिक छळ सुरू होता. अनंत गर्जे विवाहबाह्य संबंध होते यामुळे वाद वाढल्याने फाशी घेऊन आत्महत्या केली की? हत्या केली? याविषयी आरोप प्रत्यारोप होत आहे.
मुंबईतील वरळी पोलिस ठाण्यात वडिलांचे तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. शव विच्छेदनानंतर गौरीचे सासरे भगवान गर्जे, वडील डॉ. अशोक पालवे आणि त्यांच्या नातेवाईकाने पाथर्डी तालुक्यातील मोहोज (देवडे) येथे सोमवारी सकाळी 7.15 पार्थिव घेऊन आले.
स्व. गौरी यांच्या माहेर कडील नातेवाईक मोठ्या संख्येने अंत्यविधीसाठी उपस्थित झाले. प्रारंभी पासून मोठा तणाव निर्माण झाला होता. सुरुवातीला बंगल्याच्या दारात सरण रचण्याचा प्रयत्न झाला. मात्र काही प्रतिष्ठित आणि जाणकारांनी हस्तक्षेप केल्यामुळे घराच्या क्षम डाव्या बाजूच्या 10 फूट अंतरावर सरण रचण्यात आले. गौरीचे पार्थिव घराच्या बाहेर आणण्यातही डॉक्टर भावाचा विरोध. करत असल्याचे पोलीस निरीक्षक यांनी सांगितल्यानंतर पार्टी अंत्यविधीसाठी बाहेर आणण्यात आले. अखेर तीन तासाच्या तणावात सासरे भगवान गर्जे यांनी भडाग्नी दिला.
जेव्हा उपयोगाचे उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजपूत, पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक मुंडे आदींनी घटनास्थळी तणावपूर्ण परिस्थिती कौशल्याने हाताळून दोन्ही बाजूंच्या नातेवाईकांना योग्य ते समजावून अंत्यविधी करून घेण्यासाठी प्रयत्न केले.

error: Content is protected !!