बीड : बीडच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप घडला असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून विधानसभा लढविलेले पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागरयांनी अखेर भारतीय जनता पक्षात (भाजप) जाहीर प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर बीड शहरात भाजपचा प्रभाव वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली तसेच मा. पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. योगेश क्षीरसागर आणि त्यांच्या पत्नी डॉ. सारिका क्षीरसागर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी जिल्हाध्यक्ष शंकरजी देशमुख, शुभम धुत यांच्यासह अन्य सहकारी उपस्थित होते.
> गटबाजीला वैतागून राजीनामा:
> नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजीला वैतागून कालच (दिवस) डॉ. योगेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीच्या पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश करत आपली पुढील राजकीय दिशा स्पष्ट केली.
>
बीड तालुक्यात भाजपची ताकद वाढवण्याचा निर्धार
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर डॉ. योगेश क्षीरसागर यांनी आगामी काळात बीड तालुक्यात भारतीय जनता पक्षाची विचारधारा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, पक्षाचे संघटन अधिक बळकट करण्यासाठी आणि नागरिकांच्या विकासासाठी पूर्ण प्रामाणिकपणे कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
बीड तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा अधिक उंच फडकावा यासाठी आपण अखंड प्रयत्नशील राहणार असल्याचेही क्षीरसागर यांनी यावेळी स्पष्ट केले.