बीड, दि. 9 : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शहरातील सर्व व्यापार्यांची अॅन्टीजन तपासणी करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी घेतल्यानंतर काल शनिवारी सकाळपासून तपासणीला सुरूवात करण्यात आली आहे. आज दिवसभरात 2665 व्यवसायिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 131 जण पॉझीटीव्ह आढळून आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी दिली आहे.शहरातल्या 6 केंद्रावर ही तपासणी होत आहे.