धक्कादायक! बीड नगरपरिषद कर्मचारी ‘अविनाश धांडे’ यांची गळफास लावून आत्महत्या


बीड: बीड शहरातून एक अत्यंत दु:खद आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. नगरपरिषदेत वसुली कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले अविनाश धांडे यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. त्यांनी नगरपरिषदेच्या इमारतीच्या छतावर गळफास लावून आपले जीवन संपवले.


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अविनाश धांडे हे बीड नगरपरिषदेच्या वसुली विभागात कार्यरत होते.  नगरपरिषदेच्या छतावर त्यांचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेमुळे नगरपरिषद कर्मचाऱ्यांमध्ये आणि शहरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.


अविनाश धांडे यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

error: Content is protected !!