निवडणुकीत कुणाला चपटी द्यावी लागते, कोंबडं-बकरं लागतं, ‘दारू’गोळा बाहेर काढण्याची तयारी ठेवा – प्रकाश सोळुंके

आमदार प्रकाश सोळंके यांचे ‘दारूगोळा’ वक्तव्य; माजलगावमध्ये रणधुमाळी!
माजलगाव, बीड: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असतानाच, माजलगावचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना एक धक्कादायक आणि वादग्रस्त आदेश दिला आहे. निवडणुकीच्या रणांगणात उतरण्यासाठी नुसती इच्छा असून चालणार नाही, तर ‘दारूगोळा’ किती आहे, याची माहिती द्या, असे उघडपणे सांगून त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. त्यांचे हे वक्तव्य असलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे!
‘च

पटी, कोंबडं, बकरं अन् लक्ष्मी दर्शन’ – सोळंके यांचा कार्यकर्त्यांना ‘गुरुमंत्र’!
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीसाठी आयोजित केलेल्या बैठकीत बोलताना आमदार सोळंके यांनी निवडणुकीचे ‘कडवट’ वास्तव थेट मांडले. त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “शेवटच्या दोन दिवसात कुणाला चपटी द्यावी लागते, कुणाला कोंबडं कापावं लागतं आणि कुणासाठी बकरं कापावं लागतं. कुणाला लक्ष्मी दर्शन घडवावं लागतं. पण यात तुम्ही एक्सपर्ट बनलेले आहात.”

बंदुकीतून गोळ्या झाडाव्या लागतात’ – थेट आव्हान!
यापुढे जात सोळंके यांनी निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांना उघड आव्हान दिले आहे. “निवडणूक लढवण्यासाठी नुसतं इच्छुक असून उपयोग नाही, तर बंदुकीतून गोळ्या झाडाव्या लागतात,” असे ते ठामपणे म्हणाले. त्यांनी स्पष्ट केले की, इच्छुक उमेदवारांनी “आपल्याकडे काय दारूगोळा उपलब्ध आहे, याची माहिती सुद्धा आम्हाला द्यावी लागणार आहे.”


खर्चाची ‘शंभर-टक्के’ तयारी ठेवा!
आमदार सोळंके यांनी कार्यकर्त्यांना खर्चाच्या बाबतीतही सज्ज राहण्याचे आदेश दिले. ते म्हणाले, “लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत, आपण त्यांची अपेक्षापूर्ती करू शकत नाही. मात्र कुठेही कमी पडता कामा नये.” समोरचा उमेदवार जर १०० रुपये खर्च करणार असेल, तर आपलीही १०० रुपये खर्च करण्याची तयारी असावी, असा स्पष्ट आदेश त्यांनी दिला.


विधानसभेपेक्षा ‘चारपट’ वेगाने काम करा!
या निवडणुकीत जोरदार तयारी करण्याचे आवाहन करताना सोळंके यांनी कार्यकर्त्यांना ‘चारपट’ अधिक कष्ट घेण्यास सांगितले आहे. “विधानसभेपेक्षा चारपट अधिक वेगाने काम करावं लागेल, चारपटीने कष्ट घ्यावे लागतील,” असे सांगत त्यांनी माजलगावच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मोठी रणधुमाळी होणार असल्याचे संकेत दिले आहेत.
आम

दार प्रकाश सोळंके यांच्या या वादग्रस्त आणि थेट वक्तव्यामुळे आता राजकीय वातावरण तापले असून, यावर विरोधक काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे!

error: Content is protected !!