आज मुंबई येथील रामटेक या शासकीय निवासस्थानावर धनंजय मुंडे यांनी पंकजाताई मुंडे यांच्यासोबत भाऊबीज साजरी केली. यावेळी पंकजा मुंडे यांना भाऊबीजेच्या व दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
राज्याच्या राजकारणात सध्या मराठा आरक्षणावरून गदारोळ सुरू असताना आणि मनोज जरांगे पाटील यांनी पंकजाताई मुंडे यांना जाहीरपणे दिवंगत गोपीनाथ मुंडेंचे ‘खरे वारसदार’ ठरवून, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्यावर ‘संस्कारहीन’ वागणूक आणि ‘रक्ताने हात भरलेले लोक’ जमवल्याबद्दल तीव्र टीका केली आहे.
अशा परिस्थितीत, रामटेक निवासस्थानी भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा हा सण साजरा करणे, हे मुंडे कुटुंबातील भावनिक आणि राजकीय वारसा दर्शवणारे एक महत्त्वाचे क्षण ठरले आहे. ही भावनिक पोस्ट धनंजय मुंडे यांनी स्वतःच्या फेसबुक अकाउंटवरून शेअर करून, राजकीय टीका-टिप्पणीच्या वातावरणातही कौटुंबिक स्नेह जपत पंकजा मुंडे यांच्या घरी भाऊबीज साजरी केल्याचे स्पष्ट केले आहे.
Pankaja Gopinath Munde