बदनामीचा प्रयत्न केला, पण परमेश्वरानं लोकप्रिय केल – धनंजय मुंडे

परळी : आता मला माजी मंत्री म्हणतात, मला लय मोठं वाटतं. मला लय प्रसिद्धी मिळाली. काहीजण एखाद्याचं वाईट करायला बघतात, केला प्रयत्न, एव्हढे दिवस संकट सहन केलं, पण या वाईट करणाऱ्यांना लक्षात आलं नाही शेवटी नियतीला काय मान्य असतं. आपले जर साफ मन असेल तर नियती सुद्धा आपल्या सोबत राहते. जेवढं बदनाम करायचा प्रयत्न केला, त्याच्यापेक्षा जास्त न बोलता परमेश्वरानं लोकप्रिय केलं, मंत्री नसतांना असे म्हणत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी जनतेचे आभार मानले आहे. परळी तालुक्यात बोधेगाव येथे आयोजीत एका कार्यक्रमात ते बोलत होते.

error: Content is protected !!