येत्या सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंतच ठाकरे सरकार राहिल, असा दावा भाजपचे वरिष्ठ नेते नारायण राणे यांनी केला आहे. (Thackeray Goverment will remain in power till September) सरकारमध्ये समन्वय नसल्याने हे सरकार फार काळ टिकणार नाही, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
नारायण राणे भविष्य सांगणाऱ्या पक्षात गेले आहेत. पोपटासारखं कागद काढून लोकांना भविष्य सांगणारा जो पक्ष आहे त्या पक्षात त्यांचा प्रवेश झाल्यानंतर ते देखील पोपटासारखे बोलणारचं ना… अशा तिखट शब्दात नवाब मलिक(Ncp Nawab Malik) यांनी नारायण राणे (Narayan Rane) यांना खास शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे.
भविष्यवाणी करून राजकारण कधी चालत नाही. राजकारणात नंबर गेम असतो. त्यामुळे पोपटाने चिठ्ठ्या काढल्या आणि तसंच घडलं असं कधी होत नाही. भाजपमध्ये पोपटगिरी करणारे अनेक लोक आहेत.परंतू चिठ्ठ्यांवर सरकार चालत नाही, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं, असं मलिक म्हणाले.
दरम्यान, येत्या सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंतच ठाकरे सरकार राहिल. सरकारमध्ये समन्वय नसल्याने हे सरकार फार काळ टिकणार नाही. शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांमध्ये एकमत दिसत नाही त्यामुळे लवकरच हे सरकार सत्तेत जाईन, अशी भविष्यवाणी नारायण राणे यांनी केली होती.