जिल्ह्यात मुसळधार पाऊस;
मंगळवारी शाळांना सुट्टी



बीड दि.15 (प्रतिनिधी):
       जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बहुतांश तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे अनेक नद्या नाल्यांना महापूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे त्यामुळे हवामान विभागाच्या अंदाजानुसार पावसाचा जोर कायम राहणार असल्याने बीड जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व खाजगी, सरकारी शाळा, अंगणवाडी, आश्रम शाळा, महाविद्यालय यांना मंगळवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष विवेक जॉनसन यांनी म्हटले आहे.

     बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात गेल्या दोन-तीन दिवसापासून मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस कोसळत आहेत जिल्ह्यातील 16 मध्यम आणि 126 लघु प्रकल्प वसंतून वाहत असल्यामुळे शिरूर पाटोदा आष्टी बीड वडवणी गेवराई अंबाजोगाई परळी या तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
     गोदावरी नदीपात्रामध्ये एक लाख दिवसात पेक्षा अधिकच पाणी विसर्ग करण्यात येत आहे तसेच वडवणीच्या उर्दू कुंडलिका माजलगाव मांजरा या धरणातून देखील गेटमधून हजारो की सेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात येत असल्यामुळे अनेक गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे.
    बीड सह महाराष्ट्रात पुढचे काही दिवस पावसाचे संततधार सुरूच राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी मंगळवारी जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालय आश्रम शाळा अंगणवाडी यांना सुट्टी दिली आहे.
      शाळांना सुट्टी दिली असली तरी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक आणि कर्मचारी यांनी शाळेत हजर राहावे असेही आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

error: Content is protected !!