मुंबईतील मराठा आंदोलनानंतर आंदोलकांवर गुन्हे दाखल

मुंबईतील मराठा आंदोलनानंतर आंदोलकांवर गुन्हे दाखल
मुंबईत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पाच दिवस चाललेल्या आंदोलनानंतर मराठा आंदोलक माघारी फिरले आहेत. राज्य सरकारने मागण्या मान्य केल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले आणि रात्री मुंबई सोडली. परंतु, मराठा आंदोलक निघून गेल्यानंतर आता मुंबई पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे.
मरिन ड्राईव्ह आणि डोंगरी पोलिसांनी बेकायदेशीरपणे गर्दी जमवणे आणि दमदाटी केल्याप्रकरणी आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत. आझाद मैदानात मर्यादित जागा असल्यामुळे अनेक आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि आजूबाजूच्या परिसरात आश्रय घेतला होता. काही आंदोलकांनी मंत्रालय, आमदार निवास, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज आणि मरिन ड्राईव्ह परिसरातही फिरस्ती केली होती, जिथे त्यांचे काही लोकांशी वाद झाले होते.
याव्यतिरिक्त, जुहू बस स्थानकात मराठा आंदोलक आणि बेस्ट बस प्रवाशांमध्ये झालेल्या वादावरूनही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुहू पोलिसांनी अज्ञात आंदोलकांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. आंदोलनादरम्यान हा पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे. रविवारी झालेल्या या घटनेत आंदोलकांनी बसच्या काचा फोडल्या होत्या. या घडामोडींवर आता मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलक काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!