बीडमध्ये गुन्हेगारीचा सुळसुळाट; स्वराज्य नगर भागात तरुणाचा खून

बीड: गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी घटना आणि हत्यांच्या वाढत्या संख्येमुळे चर्चेत असलेल्या बीडमध्ये पुन्हा एकदा एका तरुणाच्या खुनाने खळबळ उडाली आहे. शहरातील स्वराज्य नगर भागात विजय काळे (२५) या तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने विजयच्या छातीवर आणि पोटावर चाकूने वार केले, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर हल्लेखोर फरार झाला असून शिवाजीनगर पोलीस त्याचा शोध घेत आहेत.


हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मात्र, या घटनेने बीडमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

error: Content is protected !!