बीड दि.2 (प्रतिनिधी):
जिल्हा पोलीस अधीक्षकासह वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यावर गंभीर आरोप केल्याप्रकरणी राज्याचे पोलीस महासंचालकांनी निलंबित केलेले बीड जिल्ह्याचे रहिवासी आणि बीड येथे पोलीस नियंत्रण कक्षास नियुक्तीस असलेले पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे ( वय 57) यांनी अंबाजोगाई येथील राहत्या घरी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवार दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी घडली आहे.
या संदर्भात सोमवारी रात्री उशिरा समजलेली दुःखदायक माहिती अशी की, बीड येथे गेल्या एक वर्षांपूर्वी बदलून आलेले पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे यांची जिल्हा पोलिस अधीक्षक व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी वादावादी झाली होती. सदर प्रकरणात चौकशी अहवाल राज्याच्या पोलिस महासंचालकांनी सुनील नागरगोजे यांना निलंबित केले होते.
सोमवारी रात्री 8.00 वाजण्याच्या सुमारास सुनील नागरगोजे मुळ रहिवासी परळी तालुक्यातील नागदरा यांनी अंबाजोगाई येथे सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. नागरगोजे यांनी आत्महत्या केली की काही घातपाताचा संशय आहे याप्रकरणी अंबाजोगाई पोलीस पुढील तपास करत आहेत.