परळी तालुक्यातील बिबदरा पाझर तलाव फुटल्याने शेतीचे नुकसान



परळी, २८ ऑगस्ट: परळी तालुक्यातील बोरणा नदीवरील भोजनकवाडी नागदरा येथील बिबदरा पाझर तलाव गुरुवारी पहाटे सततच्या पावसामुळे फुटला. यामुळे तलावाखालील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

माजी आमदार संजय दौंड यांनी पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप केला आहे. ३५ वर्षांपूर्वी माजी ग्रामविकास राज्यमंत्री पंडितराव दौंड यांच्या कार्यकाळात हा तलाव बांधण्यात आला होता. तलावाच्या दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांनी अनेकदा मागणी केली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने शेतजमीन वाहून जाऊन अतोनात नुकसान झाल्याचे दौंड यांनी सांगितले.

-बोरणा मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला

दुसरीकडे, परळी तालुक्यातील नंदनज येथील बोरणा मध्यम प्रकल्प २४ ऑगस्ट रोजी पूर्णपणे भरून ओव्हरफ्लो झाला आहे. प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. या जलसाठ्यामुळे प्रकल्पाखालील नंदनज, कासारवाडी, सारडगाव, मिरवट, मांडवा आणि इतर गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.

या पाण्यामुळे सारडगाव आणि नंदनज परिसरातील शेतकऱ्यांच्या सिंचन क्षमतेतही वाढ झाली आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही बोरणा प्रकल्प १०० टक्के भरल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

error: Content is protected !!