उमाकिरण प्रकरणातील आरोपीला अटक झाल्यामुळे उद्याचा बीड जिल्हा बंद मागे, आंदोलनाची पुढील दिशा लवकरच स्पष्ट


बीड, दि. २९ – उमाकिरण शैक्षणिक संकुलात अल्पवयीन विद्यार्थिनीच्या छळप्रकरणातील आरोपीला अटक झाल्यानंतर सोमवारी जाहीर करण्यात आलेला बीड जिल्हा बंद मागे घेण्यात आला आहे. महेश धांडे व सचिन उबाळे यांच्या सोशल मीडियावरील पोस्टद्वारे ही माहिती समोर आली आहे.

आंदोलनकर्त्यांनी तसेच विविध सामाजिक संघटनांनी मागील काही दिवसांपासून जोरदार आंदोलन राबवले होते. या पार्श्वभूमीवर आरोपी प्राध्यापक अटकेत आल्यानंतर बंद मागे घेत नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

तथापि, या प्रकरणात संपूर्ण चौकशी पारदर्शक व निष्पक्ष व्हावी, या मागणीसंदर्भात आंदोलनाची पुढील दिशा लवकरच निश्चित केली जाणार असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले आहे.

उमाकिरण घटनेने बीड जिल्ह्यातील शैक्षणिक व सामाजिक वातावरणात खळबळ उडवून दिली असून या घटनेतील सर्व संबंधित दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी जनतेची मागणी आहे.

error: Content is protected !!