चकलांबा, दि. २९ – पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या आदेशानुसार चकलांबा पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात सुरू केलेल्या विशेष मोहिमेमध्ये मोठी कारवाई करत प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणारी एक कार पकडली. ही कारवाई शनिवार (दि. २८) रोजी रात्री करण्यात आली असून, पोलिसांनी ₹4.83 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Gutkha smuggling in Beed, Illegal tobacco transport)
चकलांबा पोलीस ठाण्याचे सपोनि संदीप पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, नगर-बीड सीमेवरील घोगस पारगाव येथे सापळा रचण्यात आला. रात्री अंधारात संशयास्पद कार क्रमांक CH-12-TT-2162 आल्यानंतर रस्त्यावर बॅरिगेट्स लावून वाहन अडवण्यात आले. कारची तपासणी केली असता महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला गुटखा असलेली चार पोती सापडली.
याप्रकरणी कार चालक शिवाजी मारोती बटुळे (रा. भारजवाडी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेल्या मालाची किंमत अंदाजे ₹4,83,000 एवढी आहे. (Beed police gutkha case, Anti-gutkha drive Maharashtra)
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संदीप पाटील, किरण मिसाळ, प्रशांत घोगडे, अर्जुन थापडे आणि श्री. खटाणे यांनी केली.
या कारवाईमुळे बीड जिल्ह्यातील अवैध गुटखा व्यापाराला मोठा धक्का बसला आहे. प्रशासनाने अशाच प्रकारे कारवाई सुरू ठेवावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.