नवी दिल्ली – देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. अगदी सर्वसामान्य नागरिकांपासून राजकीय नेत्यांना सुद्धा कोरोनाची लागण होत आहे. यातच आता माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मुखर्जी यांनी ट्वीटकरून ही बातमी दिली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी असं मुखर्जी यांनी म्हटलं आहे. मुखर्जी यांनी ट्वीट केल्यानंतर त्यांची प्रकृती लवकर स्थिर व्हावी यासाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.