बीड दि.27 (प्रतिनिधी):
बीड शहरातील पांगरी रोडवर असलेल्या एका खाजगी क्लासमध्ये शिकणार्या अल्पवयीन मुलीचा सातत्याने लैंगिक छळ करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. पीडिता अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही, तिच्याशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी उमाकिरणच्या दोन खाजगी शिक्षकांविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात पोस्कोकायदा अंतर्गत गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रा.विजय पवार, प्रशांत खाटोकर असे गुन्हा दाखल झालेल्या खाजगी क्लासेसच्या शिक्षकांची नावे आहेत.
ही घटना 30 जुलै 2024 ते 25 मे 2025 या कालावधीत घडल्याचे समोर आले असून, आरोपी प्रशांत खाटोकर आणि विजय पवार हे दोघेही पीडितेला वारंवार क्लास संपल्यानंतर केबिनमध्ये बोलवत असत. यावेळी ते पीडितेचा जबरदस्तीने तिच्याशी अश्लिल वर्तन करणे, मोबाईलमध्ये अश्लिल फोटो काढायचे असे फिर्यादीत म्हटलेले आहे. या प्रकारामुळे पीडितेवर मानसिक आघात झाला आहे. पीडित मुलींनी घडलेली संपूर्ण घटना आपल्या पालकांना सांगितल्यानंतर त्यांनी थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध पोस्को कायदा आणि भारतीय दंडसंहिता कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून पोलीसांकडून त्यांचा शोध सुरु आहे
दरम्यान शुक्रवार दि.27 रोजी पालकांनी उमाकिरण संकुल समोर पालकांनी मोठ्या प्रमाणावर जमा होऊन आंदोलन केले. यावेळी आरोपीला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या पोलिसांचा तगडा बंदोबस्त देण्यात आला होता