बीडमधील उमाकिरण शैक्षणिक संकुलातील दोन शिक्षकांवर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल



बीड, २६ जून (प्रतिनिधी): बीड जिल्ह्यातील नामांकित शैक्षणिक संकुल असलेल्या उमाकिरणमधील दोन शिक्षकांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासल्याची भावना व्यक्त होत आहे.

विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयांचे कोचिंग क्लासेस एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे एकमेव ठिकाण अशी ओळख उमाकिरणने (Umakiran Beed) निर्माण केली होती. याच संस्थेतील विजय पवार (Vijay Pawar) आणि प्रशांत खटावकर (Prashant Khatavkar) या दोन शिक्षकांवर अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा (Crime Beed) दाखल करण्यात आल्याचे समजते. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Beed) दाखल झालेल्या या गुन्ह्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

error: Content is protected !!