गेवराई: (Georai News) तालुक्यातील मारफळा येथे विद्युत मोटारीचा शॉक लागून बाप-लेकाचा मृत्यू



गेवराई, २७ मे: गेवराई तालुक्यातील मारफळा गावात आज, मंगळवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली. शेतकरी **अभिमान लक्ष्मण कबले** आणि त्यांचा मुलगा **ज्ञानेश्वर अभिमान कबले** यांचा विद्युत मोटारीचा करंट लागल्याने जागीच मृत्यू झाला. (Georai Farmer Death)

मारफळा येथील शेतकरी अभिमान लक्ष्मण कबले (वय ५०) हे नेहमीप्रमाणे आपल्या गावाजवळील शेतात मोटार चालू करण्यासाठी गेले होते. मोटारमध्ये करंट उतरल्याने त्यांना विजेचा धक्का बसला आणि ते तिथेच चिटकले. त्यांना वाचवण्यासाठी धावलेल्या त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर अभिमान कबले (वय २२) यालाही विजेचा जोरदार धक्का बसला. या दुर्दैवी घटनेत दोघा बाप-लेकांचा जागीच मृत्यू झाला. (Electrocution Accident Georai)

घटनेनंतर दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी बीड जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेमुळे मारफळा गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. (Marfala Village Tragedy)

error: Content is protected !!