वाल्मीक कराड मुळे बीडचे कारागृह अधीक्षक बक्सार मुलानी  यांचे तातडीने बदली

नवीन कारागृह अधीक्षकपदी रामराजे चादणे रुजू होणार (New Jail Superintendent Ramraje Chandane takes charge, Beed Jail VIP Treatment Allegations)

बीड (प्रतिनिधी):बीड जिल्ह्यातील कारागृहात वाल्मिक कराड या मुख्य आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा गंभीर आरोप झाल्यानंतर कारागृह अधीक्षक बक्सार मुलानी यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता रत्नागिरीहून रामराजे चादणे हे नवीन कारागृह अधीक्षक म्हणून रुजू होणार असल्याची माहिती समोर येत आहे. (Beed Jail, VIP Treatment, Ramraje Chandane, Bakshar Mulani Transfer)

बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी हा गंभीर आरोप केला होता. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडला तुरुंगात विशेष चहा, चांगल्या प्रतीच्या चपात्या आणि इतर कैद्यांच्या नावावर कँटीनमधून दरमहा २५ हजार रुपयांची खरेदी करण्याची सुविधा दिली जात असल्याचा दावा कासले यांनी केला होता. एवढेच नव्हे, तर इतर कैद्यांना एक ब्लँकेट मिळत असताना कराडला तब्बल सहा ब्लँकेट गादीसारखे वापरण्यासाठी दिले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. (Ranjit Kasle Allegations, Valmik Karad, Jail VIP Treatment, Beed)

रणजित कासले यांना आठवडाभरापूर्वी जामीन मिळाला होता आणि त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत आपले आरोप सत्र सुरूच ठेवले होते. २५ मे रोजी त्यांनी एक व्हिडिओ जारी करत कराडला मिळणाऱ्या विशेष सुविधांचा पर्दाफाश केला होता. या आरोपानंतर तात्काळ कारागृह अधीक्षकांची बदली झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. रामराजे चादणे यांच्या रुजू होण्याने बीड कारागृहातील कारभारात काय बदल होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (Beed Prison Superintendent, Jail Reforms, Maharashtra Police)

error: Content is protected !!