प्रधानमंत्री आवास योजनेत समाविष्ट होण्यासाठी सध्या सर्व्ह सुरू आहे. बीड तालुक्यातील नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि तातडीने आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी.
नोंदणीसाठी ग्रामविकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा किंवा स्वतःच सेल्फ सर्व्ह पद्धतीने नोंदणी करावी. या योजनेत सहभागी होण्यासाठी 30 एप्रिल 2025 ही अंतिम तारीख आहे. त्यामुळे गोरगरीब नागरिकांनी कोणतीही दिरंगाई न करता आपल्या हक्काचा फायदा मिळवण्यासाठी आवश्यक ती कारवाई करावी.
पत्रकार आरबाज आतार यांनी सर्वांना वेळेत नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ही योजना नागरिकांसाठी महत्त्वाची संधी असून गरजू लोकांनी तातडीने आपली प्रक्रिया सुरू करावी.