बीडमधील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ आणि मणका विकार तज्ञ डॉ. बालाजी नवले यांचे नवे ‘तिरुपती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’ येत्या रविवारी, 2 मार्च 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता बीडकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. या रुग्णालयाचे उद्घाटन जिल्ह्यातील संत-महंत, ज्येष्ठ नागरिक, डॉक्टर, शिक्षक, वकील आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. डॉ. नवले यांनी या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
**अत्याधुनिक सुविधा आणि तज्ञ डॉक्टरांची टीम**
तिरुपती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अस्थिरोग, हृदयरोग, पोटाचे विकार आणि कान-नाक-घसा यांसारख्या विविध विभागांसाठी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध असणार आहे. रुग्णालयात हाडांची घनता तपासणी, दुर्बिणीद्वारे सांध्यांच्या आणि मणक्याच्या शस्त्रक्रिया, कृत्रिम सांधेरोपण, सायटिका, स्लिप डिस्क, स्पॉन्डिलायसिस आणि लहान मुलांमधील मणक्यांच्या विकारांवर अल्पदरात उपचार आणि मार्गदर्शन मिळणार आहे.
**उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन**
गरजू रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. बालाजी नवले आणि त्यांच्या टीमने केले आहे. उद्घाटन सोहळा न्यू लाइफलाइन हॉस्पिटलसमोर, नगर नाका, बीड येथे होणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहून रुग्णांना आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन डॉ. बालाजी नवले, हृदयरोग तज्ञ डॉ. विशाल राख, पोटविकार तज्ञ डॉ. दीपक शिंदे, कान-नाक-घसा तज्ञ डॉ. राहुल दुबाले आणि डॉ. कृष्णा म्हात्रे यांनी केले आहे.