महिलांना एसटीच्या प्रवास तिकिटामध्ये ५०% सूट देण्यात आली असून, त्या राज्यभरात कुठेही अर्ध्या तिकिटाच्या दरात प्रवास करू शकतात. यामुळे एसटी प्रवासाला महिलांची पसंती वाढली असून, प्रवाशांची संख्याही वाढली आहे. तसेच ६५ वर्षांवरील नागरिकांना देखील प्रवास दरात ५०% सूट मिळते. ७५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या स्त्री-पुरुषांना राज्यभरात कुठेही एसटीने मोफत प्रवास करता येतो. विद्यार्थ्यांसाठीदेखील एसटीने पासच्या स्वरुपात मोठी सवलत दिली आहे. मात्र एसटी तोट्यात असल्यामुळे मोफत प्रवासाची योजना बंद होणार आहे, अशी चर्चा सुरू आहे. या चर्चेवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, “एसटी बस ही सर्वसामान्यांसाठी लाईफलाइन आहे. सुरक्षित आणि स्वस्त प्रवासासाठी एसटीला प्राधान्य दिलं जातं. लांब पल्ल्यासाठी एसटीला प्रवाशांची पसंती मिळते. प्रवाशांसाठी अनेक सोई-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. एसटी तोट्यात असल्याने मोफत प्रवास बंद होणार, ही चर्चा खोटी आहे. मोफत प्रवास योजना बंद होणार नाही, हे स्पष्ट करण्यात येतंय.”
डिजिटल बोर्ड लावण्याबाबत त्यांनी म्हटलं की, “एसटीला विश्वासात घेतल्याशिवाय बोर्ड लावणे चुकीचे आहे. माहिती व जनसंपर्क विभागाने एसटीला विश्वासात न घेणं हे चुकीचं आहे. आम्ही या माध्यमातून उत्पन्न वाढवत आहोत, परंतु माहिती व जनसंपर्क विभागाने आम्हाला विश्वासात घ्यायला हवं होतं. टेंडर प्रोसेस थांबवण्याची सूचना दिली आहे.”
कर्नाटकमधील बसवर हल्ल्याच्या संदर्भात सरनाईक यांनी म्हटलं की, “बस चालकाला दमदाटी केल्यामुळे आम्ही बसेस थांबवल्या आहेत. कोणाच्याही अस्मितेवर घाला घालणं चुकीचं आहे.”
मी उद्धृत केलेल्या कायद्यातील अंशाचा दुसऱ्यांदा उल्लेख कधीही करत नाही. त्यामुळे आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.