विरोधकांकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये जाणार अशा अफवा पसरवली जात आहे, यावर नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्वीट करत पक्षाची भूमिका मांडली आहे.
विरोधकांकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जाणार अशा अफवा पसरवली जात आहे, यावर नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्वीट करत पक्षाची भूमिका मांडली आहे. ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, “राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची अफवा काही जण पसरवत आहेत. ही चर्चा बिनबुडाची आहे. उलट निवडणुकीआधी भाजपमध्ये गेलेले आमदार राष्ट्रवादीत परतण्यासाठी उत्सुक असून यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. लवकरच यावर निर्णय घेऊन सार्वजनिक केली जाईल.”