केज: भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू, दोन जखमी




केज दि. १० (प्रतिनिधी): केज शहरातील कानडी कॉर्नर वरील भगवान बाबा चौकामध्ये रविवार (दि. ९) रोजी रात्री झालेल्या भीषण अपघातात एका ४२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

शहरातील नाभिक संघटनेचे संघटक रामरतन मारुती गवळी (वय ४२) रविवार रात्री बस स्टॅन्डकडून कानडी चौकाकडे जात असताना छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून आलेल्या एका अन्य दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झाले. या अपघातात गवळी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी झाले आहेत.

जखमींची ओळख:

– सचिन दशरथ मुळे (रा. साबला, ता. केज)
– हनुमंत भागवत काकडे (रा. साबला, ता. केज)

दोघे जखमींना अंबाजोगाई येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

error: Content is protected !!