सुरेश धसांशी मला काही घेणंदेणं नाही – अजित पवार

संतोष देशमुखांची अतिशय वाईट पद्धतीने हत्या करण्यात आली, या प्रकरणातील कोणत्याही आरोपीला सोडणार नाही असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. पण या प्रकरणात एखाद्या निष्पाप व्यक्तीला शिक्षा नको, ज्याचा संबंध नाही त्याच्यावर कारवाई करण्याचा प्रश्नच नाही असंही ते म्हणाले. अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर अजित पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली


धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा प्रश्न हा भाजपचा नाही तर त्यावर अजित पवारांनी निर्णय घ्यावा असं आमदार सुरेश धस म्हणाले होते. त्यावर अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं. सुरेश धसांना काय वाटतंय त्याच्याशी मला काही घेणंदेणं नाही. मी या सरकारमधील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करतो असं अजित पवारांनी स्पष्ट केलं. महायुतीचा निर्णय घेताना आम्ही तिघे एकत्र बसून निर्णय घेतो. पण असं वेगवेगळ्या पक्षांतील खालचे कार्यकर्ते बोलायला लागले तर त्याला काही अर्थ उरणार नाही.

error: Content is protected !!