30 जानेवारीला बीडचे पालकमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली बीडमध्ये आढावा बैठक



येत्या 30 जानेवारीला बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक देखील पार पडली. बीडच्या पालकमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमध्ये येणार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक होणार आहे. 30 जानेवारी रोजी सकाळी 10:00 वाजता ही बैठक होईल. या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. प्रत्येक विभागाचे प्रस्ताव किती, प्रलंबित किती? प्रलंबित राहण्याची कारणे यावर चर्चा करण्यात आली. दरम्यान १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प सादर करतील. या संदर्भात राज्यात बैठकांचा सपाटा सुरू असून राज्य अर्थमंत्री अजित पवार यांचा बीड दौरा महत्त्वाचा समजला जात आहे.

error: Content is protected !!