बीड जिल्ह्याची खो- खो कन्या प्रियंका इंगळे हिच्या नेतृत्वाखाली भारताला आज पाहिला खो- खो विश्वचषक मिळाला आहे….!
भारताने पहिल्या खो-खो विश्वचषकावर नाव कोरले आहे. दिल्लीमध्ये रविवारी (१९ जानेवारी) पहिल्या खो-खो विश्वचषकातील महिला गटाचा अंतिम सामना खेळला गेला. अंतिम सामन्यात भारत आणि नेपाळ या दोन देशांचे संघ एकमेकांसमोर होते.
या सामन्यामध्ये बीडच्या प्रियंका इंगळेच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला खो-खो संघाने नेपाळवर ३८ गुणांच्या फरकाने विजय मिळवला. भारतीय खो- खो टीमचे अभिनंदन…!!
क्रीडा वर्तुळातून या क्षणाची सर्वात मोठी आणि अभिमानाची बातमी समोर आली आहे. भारतीय महिला संघाने पहिलावहिला खो खो वर्ल्ड कप जिंकला आहे. टीम इंडियाने नेपाळवर अंतिम सामन्यात मात करत ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. नवी दिल्लीत रविवारी 19 जानेवारीला हा महाअंतिम सामना खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाच्या महिला ब्रिगेडने नेपाळवर 38 पॉइंट्सच्या फरकाने नेपाळचा धुव्वा उडवला. टीम इंडियाने या स्पर्धेत सलामीच्या सामन्यापासून धमाकेदार कामगिरी सुरु ठेवली होती. टीम इंडिया तशीच कामगिरी अंतिम सामन्यातही केली नेपाळला 78-40 अशा फरकाने पराभूत करत वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं.
**अभिनंदन, भारतीय महिला खो-खो संघाचे!** 🥳 (Congratulations to the Indian Women’s Kho-Kho Team!)