अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अवघ्या दोन तासात जिल्हा परिषदेची केली स्वच्छता

बीड दि.18 (प्रतिनिधी):

बीड जिल्हा परिषदेच्या प्रांगणाची आवघ्या दोन तासात स्वच्छता करण्यात आली. मुख्यमंत्री महोदयांच्या 100 दिवस विकास कामाच्या निमित्ताने बीड जिल्हा परिषदेत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. शनिवार दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी सकाळी 7.00 ते 9.00 या अवघ्या दोन तासात जिल्हा परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी संपूर्ण जिल्हा परिषदेचा परिसर स्वच्छ झाला. यावेळी जिल्हा परिषदेच्या आवारातील छोटी झुडपे, कचरा आदींची सापसफाई करण्यात आली.


बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने यांच्या उपस्थिती स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप काकडे, लेखा वित्त अधिकारी सुरेश केंद्रे, कार्यकारी अभियंता पवार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्रीमती मेश्राम, आदीसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होती. जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन आणि सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

सात विभाग प्रमुखांची अनुपस्थिती शिक्षणाधिकारी (फुलारी) भगवान फुलारी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) नागनाथ शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) डॉ.ज्ञानोबा मोकाटे, शिक्षणाधिकारी (निरंतर) संजय पंचगल्ले, आदींची उपस्थित राहिले नाहीत. अनुपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर कारवाई होणार आहे.

error: Content is protected !!