बीड जिल्हात पुन्हा खून आष्टीच्या वाहिरा गावात दोन सख्ख्या भावांची हत्या, तिसरा भाऊ जखमी

आष्टी (बीड): गुरूवारी वाहिरा येथे रात्री दहाच्या दरम्यान, तीन सख्खा भावांवर काही लोकांनी लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात दोन सख्खा भावांचा जागीच मृत्यू झाला, तर एक भाऊ गंभीर जखमी झाला. ही घटना अंभोरा पोलिस ठाणे हद्दीत घडली. मयतांचे नावे अजय विलास भोसले आणि भरत विलास भोसले आहेत, तर जखमी भावाचे नाव कृष्णा विलास भोसले आहे. [violent attack]

आष्टी तालुक्यातील हातोळण येथील अजय, भरत आणि कृष्णा विलास भोसले हे तिघे भाऊ वाहिरा येथे गुरूवारी आले होते. याच ठिकाणी वाहिरा गावातील व बाहेरील काही लोक जमा झाले होते. गुरूवारी दुपारपासून हे सगळे याच ठिकाणी होते. रात्री साडे नऊ ते दहाच्या दरम्यान काही लोकांनी या तीनही भावांवर लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात अजय आणि भरत विलास भोसले यांचा जागीच मृत्यू झाला, तर तिसरा भाऊ कृष्णा विलास भोसले गंभीर जखमी झाला आहे आणि त्याच्यावर अहिल्यानगर येथे उपचार सुरू आहेत. अंभोरा पोलिसांनी सात संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. हा खून का व कोणत्या कारणावरून केला हे अद्याप समजले नाही. मृतदेह आष्टी ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. [crime news]

घटनास्थळी अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत तावरे, बाबासाहेब गर्जे, मनोजकुमार खंडागळे, भरत माने, बाबुराव तांदळे, लुईस पवार, दत्तात्रय टकले, पोलीस अंमलदार शिवदास केदार आणि सतीश अमोल शिरसाठ यांनी भेट दिली आणि ताब्यात घेतलेल्या सात आरोपींना तपासून पाहिले. [police investigation]

error: Content is protected !!