पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत, जिथे ते महायुतीच्या आमदारांशी संवाद साधणार आहेत. त्यांनी नौदल गोदीत आयएनएस सुरत आणि आयएनएस निलगिरी या युद्धनौकांचे तसेच आयएनएस वाघशीर या पाणबुडीचे राष्ट्रार्पण केले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अन्य वरिष्ठ अधिकारीही या कार्यक्रमाला उपस्थित होते. मोदी खारघर येथील इस्कॉन मंदिराचे उद्घाटनही करतील.
या भाषणात मोदींनी भारतीय नौदलाच्या गौरवशाली इतिहास आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेचे महत्व अधोरेखित केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या योगदानाचे त्यांनी विशेष उल्लेख केले आणि भारताला एक समृद्ध सागरी वारसा असल्याचे सांगितले. मोदींनी असेही नमूद केले की, युद्धनौका आणि पाणबुडी मेड इन इंडिया आहेत, ज्यामुळे नौदल सशक्त होईल आणि सागरी सुरक्षा सुनिश्चित होईल.
दोन्ही युद्धनाैकांसह पाणबुडी भारत निर्मित
पुढे मोदी हे म्हणाले की, दोन्ही युद्धनाैकांसह पाणबुडी भारत निर्मित आहेत. नौसेनेला सशक्त करण्यासाठी आपण मोठं पाऊल उचलत आहोत. समुद्राला सुरक्षित बनवायचं आहे, त्यादृष्टीने काम करूयात, असे मोदींनी म्हटले. भारतीय नौदल ताकदवान बनतंय. भारतानं सागर हा जगाला मंत्र दिला. वाघशीर या 6 व्या पाणबुडीचं राष्ट्रार्पण करण्याच भाग्य मिळालं. दोन्ही युद्धनौकांसह पाणबुडी मेड इन इंडिया असल्याचे मोदींनी म्हटले