राष्ट्रवादीचे नेते (NCP Leader) बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबरला मुंबईतील (Mumbai) वांद्रे (Bandra) येथील मुलाच्या कार्यालयासमोर (office) गोळ्या घालून हत्या (Murder) करण्यात आली. या घटनेनंतर राज्यात सर्वत्र खळबळ (commotion) उडाली होती. मात्र, या हत्येनंतर अनेक प्रश्नांची उत्तरे अद्यापही मिळालेली नाहीत. आता बाबा सिद्दीकी यांचा मुलगा (Son) झिशान सिद्दीकीने पोलिसांच्या तपासावर (investigation) नाराजी व्यक्त केली आहे.
संशयिताची अद्यापही चौकशी नाही
बाबा सिद्दीकी यांची हत्या बिश्नोई गँगने (Bishnoi Gang) केली की अजून कोणी केली, यासंदर्भात अद्यापही माहिती (information) पोलिसांना मिळालेली नाही. त्यामुळे झिशान सिद्दीकी यांनी पोलिसांच्या तपासावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी आरोप केला आहे की, या प्रकरणातील पोलीसच काही आरोपींना वाचवत (protecting) आहेत. यासंदर्भात झिशान सिद्दीकी यांनी गुरुवारी मुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट (meeting) घेतली आणि तपासातील काही त्रुटी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत.
हत्या प्रकरणात बिल्डर लॉबीचा सहभाग?
बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात बिल्डर लॉबीचा (Builder Lobby) सहभाग असल्याचा गंभीर आरोप (serious allegation) झिशान सिद्दीकी यांनी केला आहे. त्यांनी पोलिसांना विचारले आहे की, तपासादरम्यान ज्या बिल्डरवर (Builder), बांधकाम व्यावसायिकांवर (construction professionals) संशय (suspicion) व्यक्त केला, त्यांची अद्याप चौकशी का केली नाही. याशिवाय, या खूनप्रकरणाशी बिल्डर लॉबीचा संबंध असू शकतो, त्यामुळेच पोलिसांनी अद्यापही त्यांची चौकशी केली नाही असा ठपका झिशान सिद्दीकी यांनी ठेवला आहे. त्यामुळे आता बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणामध्ये नेमका कोणाचा हात आहे हे अद्यापही अस्पष्ट आहे.