बीड: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केलेले राजेंद्र मस्के यांना पार्टीने महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. पार्टीने त्यांना बीड जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे.
बीडच्या राजकारणात दीर्घकाळ सक्रिय असलेले मस्के यांनी भाजपमध्येही जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर ते भाजपमध्ये अस्वस्थ होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर बीड विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत ते आमदार संदीप क्षीरसागर यांच्या प्रचारात सक्रिय होते.
आता राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे. ही नियुक्ती पार्टीच्या मुंबई येथील कार्यालयात पार पडली.