तर  खासदाराची चड्डी राहणार नाही’, बजरंग सोनवणेंबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची बदली

गणेश मुंडे यांची पुणे नियंत्रण कक्षात बदली

खासदार बजरंग सोनवणे यांच्याबद्दल वादग्रस्त पोस्ट केल्यानंतर बीडमध्ये कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे यांची पुणे नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. अधिकृत व्हाट्सअॅप ग्रुपवर शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि राज्यभरात संताप व्यक्त करण्यात आला. या पोस्टमध्ये मुंडे यांनी असा दावा केला होता की, जर त्यांनी पत्रकार परिषद घेतली तर खासदाराची प्रतिष्ठा मोठ्या प्रमाणात धोक्यात येईल.  राज्य सरकारने त्यानंतर मुंडे यांना बीडमधून हटवले आहे.

बीडच्या पोलीस अधिकाऱ्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल जर मी पत्रकार परिषद घेतली तर या तर खासदाराची चड्डीसुद्धा जागेवर राहणारी नाही, या आशयाची पोस्ट पोलीस अधिकारी गणेश मुंडे यांनी केली होती. गणेश मुंडे हे बीडमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. बीड पोलीसांचा एक अधिकृत व्हाट्सअॅप ग्रुप आहे. या ग्रुपवर ही पोस्ट शेअर करण्यात आली होती. दरम्यान, बजरंग सोनवणे यांनीही याबाबत भाष्य केल्यानंतर ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानंतर बजरंग सोनवणे यांनी या पोलीस अधिकाऱ्याचे देखील कॉल रेकॉर्ड चेक करावेत, अशी मागणी केली होती.

error: Content is protected !!