वंजारी समाजाविषयी द्वेष भावना पसरविणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करा; वंजारी कर्मचारी सेवा संघ आक्रमक

वंजारी समाजाविषयी द्वेष भावना पसरविणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करा; वंजारी कर्मचारी सेवा संघ आक्रमक

बीड दि.5 (प्रतिनिधी):
येथील जिल्हा वंजारी कर्मचारी सेवा संघाच्या वतीने अंजली दमानिया आणि इतरांनी वंजारी समाजाबद्दल आपशब्द वापरल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी बीड शहर बीड शिवाजीनगर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन हे आंदोलन सुरू झाले आहे.


बीड जिल्ह्यात सरपंच देशमुख हत्याप्रकरणी संबंधित दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी. मात्र सदर घटनेच्या आडून काही स्वार्थी राजकारणी समाजसेवेच्या नावाखाली अंजली दमानिया सारखे लोक जातीय द्वेष भावना पसरत आहेत. वंजारी समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. याप्रकरणी कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वंजारी कर्मचारी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष मोहन आघाव यांच्यासह ऍड.महेश गर्जे, भाऊसाहेब हांगे, अँड. राख, आदीसह सुमारे 500 कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे.


तत्पूर्वी बीड येथील ‘श्रीसंत भगवानबाबा सामाजिक प्रतिष्ठान’वर सुमारे 700 ते 800 सेवा संघाचे कर्मचारी, युवक आणि तरुण कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यामध्ये याप्रकरणी पुढची दिशा ठरविण्यात आली आहे.

error: Content is protected !!