देशद्रोहाचा गुन्हा असलेले कार्यकर्ते बजरंग सोनवणे यांच्या सोबत – शिवलिंग मोराळे


शिवलिंग मोराळे यांनी सांगितले की, ज्या दिवशी अजित दादा बीडमध्ये आले होते, त्यावेळी मी माझ्या कामगारांना भेटायला गेलो होतो. मी अजित दादा यांच्या दौऱ्यात होतो, मात्र माझ्या मित्राच्या गाडीत गेलो होतो. गाडीचे लोकेशन माध्यमांसमोर सादर केले आहे. माझी नार्को टेस्ट केली तरी आम्ही त्याला सामोरे जायला तयार आहोत. याचे दूध का दूध पाणी का पाणी स्पष्ट होणार आहे.

मोराळे यांनी आरोप केला की, हे राजकारण सुरू असून धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पदापासून रोखण्यासाठी सुरेश धस आणि बजरंग सोनवणे यांच्याकडून हे सुरू आहे. माझी गाडी केवळ वाल्मिक कराड यांना सीआयडी ऑफिसला सोडण्यासाठी होती. आरोप सिद्ध झाला तर माझ्यासारखा कार्यकर्ता भर चौकात फाशी घेईल. मी पंधरा वर्षे बजरंग सोनवणे यांच्या नेतृत्वात काम केले आहे.

देशद्रोहाचा गुन्हा दाखल असलेले कार्यकर्ते बजरंग सोनवणे यांच्या सोबत असल्याचे सांगत, त्यांनी खासदार बजरंग सोनवणे यांचे आरोप फेटाळत हल्लाबोल केला आहे. जातीत भांडण लावण्याचे काम सध्या सुरू आहे. ही सर्व खेळी सुरेश धस आणि बजरंग सोनवणे यांच्याकडून सुरू आहे. बजरंग सोनवणे आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांवर बिनबुडाचे आरोप करून अन्याय करू नका, असेही शिवलिंग मोराळे म्हणाले.

error: Content is protected !!