वाल्मिक कराडना धक्का

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील मास्टरमाईंड, 31 डिसेंबर रोजी पुण्यातील सीआयडी कार्यालयात स्वत:हून उपस्थित झाले. त्यांना बीडच्या केज कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. कराडवर पवनऊर्जा प्रकल्पातील 2 कोटींच्या खंडणी प्रकरणात आरोप आहेत.

यावेळी सरकारी वकील जे. बी. शिंदे यांनी 15 दिवसांची पोलीस कोठडी देण्याचा युक्तिवाद केला, तर कराडचे वकील अशोक कवडे यांनी जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला. अखेर न्यायाधीश बाविस्कर यांनी 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. कराडसह विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यावर खंडणीचे आरोप आहेत.

या प्रकरणात संतोष देशमुख यांच्या बंधूंनी धनंजय मुंडेंच्या मंत्रीपदाविरुद्ध याचिका दाखल केली आहे.

error: Content is protected !!