बीड प्रकरणात धनंजय मुंडेंचा कुठलाही संबंध असण्याची शक्यता नसावी- मंत्री दत्तामामा भरणे यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडने पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण घेतली आहे. त्याला 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. कराडवर पवनचक्की प्रकल्पातील दोन कोटींच्या खंडणी प्रकरणातही गंभीर आरोप आहेत. कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय समजला जातो. 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती.

दरम्यान, मंत्री दत्तामामा भरणे यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, बीड प्रकरणात धनंजय मुंडेंचा संबंध असण्याची शक्यता नाही.

दत्तामामा भरणे यांनी सांगितले की, ते लवकरच मंत्रीपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. त्यांनी नाराजी नसल्याचे स्पष्ट केले आहे.

धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी होत आहे. सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत धनंजय मुंडेंना मंत्रीपदावरून हटवण्याचे निर्देश देण्याची विनंती केली आहे.

error: Content is protected !!