नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी 19 किलोग्रॅम वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 14.50 रुपयांनी कपात करण्यात आली आहे, तर घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे.
१ जानेवारी २०२५ पासून नवे दर लागू करण्यात आले आहेत. दिल्लीमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडर १८०४ रुपये, मुंबईत १७५६ रुपये, चेन्नईमध्ये १९६६ रुपये आणि कोलकातामध्ये १९११ रुपये आहे. घरगुती गॅस सिलिंडर दिल्लीमध्ये ८०३ रुपये, कोलकातामध्ये ८२९ रुपये, मुंबईत ८०२.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ८१८.५० रुपये आहे.
गेल्या सहा महिन्यांत दरवाढीनंतर आता कपात करण्यात आली आहे. डिसेंबर २०२४ पर्यंत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात एकूण १७२.५ रुपयांनी वाढ झाली होती. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात शेवटची कपात मार्च २०२४ मध्ये १०० रुपयांनी झाली होती.