Beed जितेंद्र आव्हाडांवर ॲट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी; धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते आव्हाडांविरोधात आक्रमक



मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी शनिवारी झालेल्या सर्वपक्षीय मूक मोर्चानंतर बीडमध्ये मोठा गदारोळ उडाला आहे. शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या व्हायरल चॅट प्रकरणाने खळबळ उडाली असून धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. मुंडे समर्थकांनी जितेंद्र आव्हाडांवर ॲट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी केली आहे. दलित बांधवांसह धनंजय मुंडे यांचा खास माणूस पोलीस ठाण्यात दाखल झाला असून संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या भाषणाविरोधात अब्रू नुकसानीचा दावा करत कार्यकर्त्यांनी तक्रार दाखल केली आहे. दलित समाज बांधवांबाबत जितेंद्र आव्हाड यांचे कथित व्हाट्सअप चॅट व्हायरल झाल्यानेही आक्रमकता वाढली आहे. मुंडे कार्यकर्त्यांनी आव्हाडांवर ॲट्रॉसिटी दाखल करेपर्यंत इथून जाणार नसल्याचे माध्यमांना सांगितले आहे.

Sharad Pawar Group, Jitendra Awhad Controversy

शनिवारी झालेल्या सर्वपक्षीय मोर्चात मंत्री धनंजय मुंडे यांच्या हकालपट्टीची मागणी करत पालकमंत्रीपदही त्यांना देऊ नये अशी एकमुखाने मागणी करण्यात आली होती. त्यानंतर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे चॅट व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते आव्हाडांविरोधात आक्रमक

राज्यात मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याविरोधात बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला कोणाचाही विरोध नव्हता. धनंजय मुंडे आणि इतर सर्वांनी सांगितले की ही हत्या कोणत्याही जातीय कारणातून झाली नाही. हत्येचे कारण वेगळे होते, त्यामुळे त्याला जातीयवादाचे स्वरूप देऊ नका. असे सांगूनही जितेंद्र आव्हाड मूक मोर्चात आले आणि भाषणात दलित, मुस्लिम या लोकांना बोलवून घ्या, पैशांची काळजी करू नका, जे पैसे लागतील ते मी देतो अशी भाषा वापरली. त्यांच्या व्हायरल झालेल्या चॅटमध्येही त्यांनी धनंजय मुंडे यांचा एकेरी उल्लेख केला. याचा तीव्र निषेध करून आव्हाडांवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यासाठी कार्यकर्त्यांनी ॲडिशनल पोलीस अधीक्षकांना भेटले. आज त्यांनी गुन्हा दाखल केला आहे. आव्हाडांवर ॲट्रॉसिटी दाखल केल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही, असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला आहे.

error: Content is protected !!