बीड (10 Aug): बीड जिल्ह्यात शनिवारचे कोरोनाने द्विशतक ठोकले आणि आज पुन्हा रविवारी दिवसभरात तब्बल 233 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. प्रशासनाने सोमवारी रात्री साडेबाराच्या सुमारास हा अहवाल जाहीर केला.
बीडमध्ये रविवारी केलेल्या अॅन्टीजेन टेस्टमध्ये 137 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आज दिवसभरात ३८५५जणांच्या टेस्ट करण्यात आल्या. तर रात्री उशीरा स्वारातिच्या प्रयोग शाळेकडून प्राप्त झालेल्या अहवालातून ९६ जण कोरोनाबाधीत असल्याचे आढळून आले. त्यामुळे बीड जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांची एकूण संख्या आता १८१८ झालेली आहे. आजच्या अहवालात एकूण ३६२२जणांचे नमुने निगेटिव्ह आढळले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 49 बाधीतांचा मृत्यू झालेला आहे. आज आढळून आलेल्यांमध्ये सर्वाधिक बीडमधील रुग्ण असून अॅन्टीजेन टेस्टमध्ये 137 . जिल्हा भरात पॉझिटिव्ह आढळलेल्यांमध्ये बहुतांश जणांना आपण कोणाच्या संपर्कात आलोत याची कसलीही माहिती नाही. त्यांच्यात लक्षणे नाहीत तरीही ते पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.याचा अर्थ समूह प्रसाराला (community transmission )सुरवात झाली आहे.
आज अॅन्टीजेन टेस्ट करण्याचा शेवटचा दिवस आहे. आणि परवापासून बीड जिल्ह्यातील ५ तालुक्यात 10 दिवसचे lockdown सुरु होत आहे.
बीड मध्ये सर्वाधिक कोरोन पॉझिटिव्ह
आज आलेल्या रिपोर्ट मध्ये सर्वाधिक पॉझिटिव्ह हे बीड मधील आहेत एकूण १६२ रुग्ण हे बीड तालुक्यातील आहेत. १६३ मधील १३६ हे अॅन्टीजेन टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह आले आहेत.
कोणत्या तालुक्यात किती पेशंट
बीड 163
अंबाजोगाई 10,
आष्टी 6,
धारूर 2 ,
गेवराई 10,
केज 7 ,
माजलगाव 7
, परळी 22,
पाटोदा 2,
शिरूर 3,
वडवणी 1
इथे आढळले रुग्ण




